कोपरगाव नगरपालिकेच्या होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 6 मध्ये जनतेच्या मूलभूत समस्या वेळेत न सुटल्याने माजी नगरसेवक योगेश बागुल आणि नगरसेविका ऐश्वर्यालक्ष्मी संजय सातभाई यांच्याबाबत नागरिकांमध्ये नाराजी आहे.
विशेषतः अखिल सय्यद घर ते दत्त पार गटार, अंबिका मंदिर ते जब्बार मणियार घर रस्ता, महादेव मंदिर ते श्रीराम मेडिकल रस्ता तसेच कापड बाजारातील गोकर्ण गणपती मंदिर ते श्रीराम मेडिकल रस्ता ही महत्वाची विकासकामे अद्याप अपूर्ण असल्याने नागरिकांचा असंतोष वाढत आहे.

रस्ते, गटार व दैनंदिन नागरी सुविधांशी संबंधित हे प्रश्न वारंवार मांडूनही त्यावर ठोस उपाययोजना न झाल्याची भावना प्रभागात दिसून येत आहे. स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, विद्यमान आमदार आशुतोष दादांच्या माध्यमातून झालेली काही कामे सोडली, तर नगरसेवकांच्या स्वतंत्र प्रयत्नांतून प्रभागात ठोस स्वरूपाची कामे दिसून येत नाहीत, त्यामुळे प्रतिनिधी म्हणून अपेक्षित भूमिका पार पाडली गेली नसल्याची भावना नागरिकांची आहे.

या पार्श्वभूमीवर, जनतेशी सातत्याने संपर्क ठेवून अडचणीच्या वेळी मदतीस धावून येणाऱ्या फंड सारिका आणि भुतडा मुकुंद यांच्याबाबत नागरिक सकारात्मक मत व्यक्त करत आहेत.
लोकांच्या समस्या समजून घेणारे, प्रत्यक्ष काम करणारे आणि उपस्थित राहणारे नेतृत्व हवे असल्याने प्रभाग क्रमांक 6 मध्ये यावेळी काम करणाऱ्या व्यक्तींनाच संधी द्यावी असा जनतेचा सूर ठळकपणे जाणवत आहे.
